NEET 2020 Postponed

NEET PG 2020 Postponed

नीट पीजी २०२१ परीक्षा स्थगित करण्यात आली आहे.

NEET PG 2021: Postponed: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नीट पीजी २०२१ परीक्षा (NEET PG 2021) स्थगित केली आहे. अधिकृत संकेतस्थळावर याबाबतचं नोटिफिकेशन देण्यात आलं आहे. त्यानुसार, नीट पीजी २०२१ परीक्षा १० जानेवारी २०२१ रोजी होणार होती. मात्र आता पुढील आदेश येईपर्यंत ही परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. नीट पीजी परीक्षेच्या नव्या तारखांची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

NEET PG 2021 का झाली स्थगित?

नीट पीजी २०२१ स्थगित करण्याचा निर्णय राष्ट्रीय वैद्यकिय आयोगाद्वारे (NMC) कळवल्यानंतर आला आहे. एनएमसीने सांगितलं की नीट पीजी २०२१ च्या तुलनेत आयोगाच्या यूजी आणि पीजी बोर्ड द्वारा सीबीएसई विविध प्रतिनिधींशी चर्चा सुरू आहे.

NEET PG 2021 चे अर्ज नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिकृत सूचनेसह जारी होण्याची शक्यता आहे. नीट पीजी २०२१ आधी १० जानेवारी २०२१ रोजी आयोजित केली जाणार होती आणि नीट एमडीएस २०२१चे आयोजन १६ डिसेंबर २०२० रोजी होणार होते. नीट पीजी २०२१ च्या आयोजनाच्या नव्या तारखा अद्याप जारी केलेल्या नाहीत.

NEET PG 2021 परीक्षा देशातील १६२ शहरांमध्ये संगणक आधारित पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. NEET PG 2021 च्या माध्यमातून १०,८२१ मास्टर्स ऑफ सर्जरी (MS) जागांवर प्रवेश, १९,५५३ जागांवर डॉक्टर आणि अन्य १,९७९ पीजी डिप्लोमा जागांवर प्रवेश होतील. देशातील तब्बल ६,१०२ सरकारी, खासगी, डिम्ड आणि केंद्रीय विद्यापीठे या भरती प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.


JEE Mains 2020 and NEET 2020 Postponed Till the End of May due to Coronavirus

 

JEE Mains 2020 and NEET 2020 have been postponed to the last week of May 2020 due to the Coronavirus crisis that has engulfed the entire world. The decision to postpone the exams further was announced by Dr Ramesh Pokhriyal Nishank, Union Cabinet Minister for Human Resource Development.

 

NEET अखेर पुढे ढकलण्यात आली आहे!

देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी प्रवेश परीक्षा NEET अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. ही परीक्षा MBBS, BDS आणि AYUSH अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. कोरोना विषाणूच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात असलेल्या लॉकडाऊमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ही माहिती दिली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही परीक्षा लांबणीवर टाकण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या या काळात घरी बसून परीक्षेचा अभ्यास करावा असे देखील पोखरियाल यांनी सांगितले आहे.
नीट परीक्षेची परीक्षा केंद्रे दूरवर असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवास करून केंद्रावर जावे लागते. परीक्षेलाही लॉकडाऊन आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीचा फटका बसण्याची दाट शक्यता होती. लॉकडाऊन 14 एप्रिलपर्यंत असल्याचे निर्देश आहेत. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. परिणामी खबरदारी म्हणून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

JEE बाबत अद्याप निर्णय नाही

25 एप्रिल रोजी होणारी हॉटेल मॅनेजमेंटच्या प्रवेश परीक्षेबाबत म्हणजेच JEE बाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. वेळापत्रकानुसार या विद्यार्थ्यांना 1 एप्रिल रोजी अॅडमिट कार्ड मिळणार आहे. मात्र, ही परीक्षादेखील लांबवणीवर पडण्याची शक्याता आहे.

Big Police Recruitment In The Maharashtra State After December 2020

Big Police Recruitment In The Maharashtra State After December 2020

 राज्यात डिसेंबरनंतर 25 हजार पदांची मोठी पोलिस भरती!  

राज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झालेला पोलिसांचा मृत्यू, पदोन्नतीने रिक्‍त झालेल्या जागांमुळे आणि सेवानिवृत्ती व बडतर्फ, निलंबनामुळे राज्यात पोलिस दलातील रिक्‍त पदांची संख्या वाढली आहे. या पार्श्‍वभूमीवर वर्षाअखेर मोठी पोलिस भरती होण्याची शक्‍यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी व्यक्‍त केली. प्रशिक्षण व खास पथके विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी जानेवारी 2021 ते डिसेंबर 2022 या काळातील रिक्‍त पदांची माहिती तातडीने मागविली आहे. परंतु, मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे .

राज्यात डिसेंबरनंतर मोठी पोलिस भरती

महत्वाचे! पोलिस भरतीचे शैक्षणिक व शारीरिक निकष कोणते? जाणून घ्या.

 राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील पोलिस शिपाई आणि चालक पोलिस शिपायांची किती पदे रिक्‍त आहेत, याची माहिती अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयास तत्काळ ऑनलाइन सादर करावी, असे आदेश शुक्रवारी (ता. 23) दिले. त्यात सर्व पोलिस आयुक्‍त (लोहमार्ग- मुंबईसह), पोलिस अधीक्षक (नाशिक ग्रामीण वगळून), पोलिस आयुक्‍त (बृहन्मुंबई), सर्व समादेशक (राज्य राखीव पोलिस दल गट क्र. एक ते 16) यांच्याकडून रिक्‍त पदांची माहिती संकलित करण्यात आली आहे.

मेगा पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १६०० जागा राखीव;

पोलीस भरती अपेक्षित प्रश्नसंच (मोफत टेस्ट सिरीज)

पोलीस भरती २०२० लेखी परीक्षा महत्वाच्या ट्रिक्स 

याबद्दल लोहमार्गचे अप्पर पोलिस महासंचालक, एसआरपीएफचे अप्पर पोलिस महासंचालक, पोलिस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र, नागपूर), सर्व परिक्षेत्रीय विशेष पोलिस महानिरीक्षक आणि राज्य राखीव पोलिस बलाचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांचा समावेश आहे. भरतीनंतर एक वर्षाचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतरच संबंधितांना नियुक्‍ती दिली जाते. त्यामुळे भरतीचे नियोजन एक वर्षापूर्वीच केले जाते. त्यानुसार मैदाने उपलब्ध करुन भरती प्रक्रिया राबविली जाते. त्यादृष्टीने आता नियोजन सुरु झाले आहे, परंतु मराठा आरक्षणाला स्थगिती असल्याने भरतीसंदर्भात सरकारने घोषणा केली नसल्याची चर्चा आहे.

राज्यात पोलीस निरीक्षकांची ५०० पदे रिक्त

राज्य पोलीस दलात १२ हजार पदांची जम्बो भरती

 ठळक बाबी… 

  •  आगामी दोन वर्षांची एकत्रित राबविली जाणार भरती प्रक्रिया 
  •  आरक्षणनिहाय माहिती काढण्याचे काम सुरु असल्याची सूत्रांची माहिती 
  •  कोरोनामुळे मृत्यू, सेवानिवृत्ती, निलंबन, बडतर्फी, पदोन्नतीमुळे रिक्‍त झाली पदे 
  •  भरतीच्या अनुषंगाने प्रशिक्षणचे अप्पर पोलिस महासंचालकांनी मागविली पोलिस शिपाई व चालक शिपायांची माहिती 
  •  2019 आणि 2020 मध्ये भरती न झाल्याने साडेबारा हजार जागा झाल्या रिक्‍त 
  •  डिसेंबर 2020 नंतर सुमारे 25 हजार रिक्‍त पदांची राबविली जाणार नवी पदभरती 

रिक्‍त पदांची माहिती घेऊन प्रशिक्षणाच्या मैदानांची तयारी
राज्यात दरवर्षी साधारणपणे सहा हजार पदे रिक्‍त होतात. 2019 आणि 2020 मध्ये पोलिस भरती झालेली नाही. 1 जानेवारी 2021 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रिक्‍त होणाऱ्या पोलिस शिपायांची माहिती मागविली आहे. त्यानुसार मैदाने तयार ठेवून भरतीच्या दृष्टीने तयारी केली जाणार आहे.-संजयकुमार, अप्पर पोलिस महासंचालक, विशेष प्रशिक्षण

सोर्स: सकाळ

Postponed MPSC Exam 2020

MPSC Exam Postponed Again

MPSC ची परीक्षा अखेर पुढे ढकलली, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठा आंदोलकांच्या तीव्र विरोधानंतर MPSC ची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. २ लाख ६० हजार विद्यार्थी या परीक्षेला बसणार होते. मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर या प्रकरणी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज पार पडली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हा निर्णय झाला. “११ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात MPSC ची परीक्षा होती. मात्र करोना आणि लॉकडाउनचं संकट होतं. काही प्रमाणात अजूनही आहे. त्यामुळे आम्ही एक सारासार विचार केला. विद्यार्थ्यांना अभ्यासाला मिळाला पाहिजे हा विचार आम्ही केला त्यामुळे आम्ही ही परीक्षा पुढे ढकलत आहोत. परीक्षा कधी होणार याचा निर्णयही लवकरच घेतला जाईल” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं.

आजच खासदार उदयनराजे भोसले यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहून MPSC ची परीक्षा पुढे ढकलावी असं म्हटलं होतं. मराठा समाज संयमी आणि शांत आहे पण प्रसंगी आक्रमकही होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं. तर मराठा आरक्षण प्रकरणी वेळ पडल्यास आपण तलवारही उपसू शकतो असं वक्तव्य संभाजीराजेंनी केलं होतं. मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी संभाजीाजेंनीही केली होती. ज्यानंतर अखेर राज्य सरकारने ११ ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील २ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही

MPSC च्या परीक्षेची तारीख सध्या आम्ही पुढे ढकलली आहे. मात्र यापुढे जी तारीख ठरेल त्या तारखेत बदल केला जाणार नाही. मराठा समाजाकडूनही आम्हाला परीक्षा पुढे ढकला अशी विनंती केली होती. आता जे विद्यार्थी  परीक्षेला पात्र आहेत तेच विद्यार्थी जेव्हा परीक्षा जाहीर होईल तेव्हा त्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी अपात्र ठरणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं आहे. काही विद्यार्थी करोनाग्रस्त आहेत. काही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळालेला नव्हता. त्यामुळे ११ ऑक्टोबरची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र आता जी काही तारीख जाहीर होईल त्यामध्ये बदल होणार नाही. असंही उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.


MPSC परीक्षेच्या तारखेत बदल ; MPSC’चा मोठा निर्णय!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे तीन परीक्षेच्या च्‍या तारखेत पुन्‍हा एकदा बदल करण्यात आला आहे.   महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे सोमवारी  (ता.०७) परीपत्रक जारी करत वेळापत्रकात बदल केल्‍याचे कळविले आहे. कोविड परिस्थिमुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहितीकरिता येथे क्लिक करा 


महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 20 सप्टेंबरची परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर होणार

NEW UPDATE: MPSC Exam 2020: The Maharashtra State Public Service Commission’s recruitment examination for various posts to be held on September 20 will now be conducted not only in Mumbai and Pune but at all the divisional centers in the state. The decision is made against the backdrop of the corona

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर होणार आहे.

मुंबई  : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची २० सप्टेंबर रोजी होणारी विविध पदांसाठीची भरती परीक्षा, आता फक्त मुंबई आणि पुणे येथे न होता, राज्यातील सर्व विभागीय केंद्रांवर घेतली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष सतिश गवई यांच्याशी परीक्षा उमेदवारांच्यावतीने चर्चा केली आणि कोरोना परिस्थितीमुळे फक्त मुंबई आणि पुणे येथे परीक्षा ठेवल्यास राज्याच्या अन्य भागातील स्पर्धा परीक्षेतील उमेदवारांना रेल्वे सेवा बंद असल्याने परीक्षास्थळी पोहोचणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती निदर्शनास आणत ही परीक्षा सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेण्यात यावी अशी सूचना केली.

अखेर २० सप्टेंबर २०२० रोजी होणारी ही परीक्षा मुंबई, पुणे यांसह राज्यातील सर्व महसूल विभागीय केंद्रांवर घेतली जावी ही सूचना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मान्य केली आहे.  यामुळे स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची अडचण दूर केल्याने राज्याच्या सर्व विभागातून या निर्णयाचे स्वागत होत आहे.  अनेक उमेदवारांनी यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांचे आभार मानले आहेत.

परीक्षांचे वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे वेळापत्रक अंदाजित असून त्यामध्ये बदल होऊ शकतो असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


Postponed MPSC Exam 2020

MPSC has decided to postpone the state service examination to be held on September 13. The MPSC has decided to postpone the state service examination as it will be held on September 13 across the country and now it will be held on September 20. This has been officially announced by the MPAC through a letter.

एमपीएससीकडून १३ सप्टेंबरला होणारी राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशभरात १३ सप्टेंबरला नीट परीक्षा होणार असल्याने राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला असून आता २० सप्टेंबरला ही परीक्षा होणार आहे. एमपीएसीकडून पत्रकाद्वारे अधिकृतरित्या हे जाहीर करण्यात आले आहे.

करोना विषाणूच्या संसर्गामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने तिसऱ्यांदा परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक १७ जून रोजी जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ११ ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर होणार होत्या. मात्र, १३ सप्टेंबर रोजी देशभरात नीट परीक्षा होणार असून त्याच दिवशी राज्य सेवा पूर्व परीक्षा होणार होती. त्यामुळे एमपीएससीने पुन्हा एकदा ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

 

एमपीएससीने २३ डिसेंबर २०१९ रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहीरातीनुसार, राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२० रविवार, ५ एप्रिल २०२० रोजी घेण्याचे निश्चित केले होते. मात्र, करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे १७ जून २०२० रोजी एमपीएससीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही परीक्षा १३ सप्टेंबर रोजी घेण्याचे घोषीत केले. आयोगाकडून परीक्षेचा दिनांक निश्चित करण्यात आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून ३ जुलै २०२० रोजीच्या सूचनेद्वारे राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (नीट) १३ सप्टेंबर २०२० रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आले.

आयोगामार्फत आयोजित परीक्षेकरीता उमेदवारांची संख्या तसेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी प्रवेश देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता दोन्ही परीक्षांचे एकाच दिवशी आयोजन करण्यास परीक्षा उपकेंद्राच्या उपलब्धतेसह अन्य प्रशासकीय अडचणी निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून घेण्यात येणारी परीक्षा ही देश पातळीवर घेण्यात येणार आहे, ही बाब लक्षात घेऊन प्रशासकीय कारणामुळे एमपीएससीने आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा २० सप्टेंबर रोजी घेण्याचे निश्चित करण्यात आल्याचे एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Notification

The Commission took a big decision regarding the Answer Sheets of MPSC Exams

MPSC परीक्षांच्या उत्तरपत्रिकांबाबत आयोगाने घेतला मोठा निर्णय-जाणून घ्या

उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे.  मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज, निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण व उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संदर्भात आयोगाने परिपत्रक काढून माहिती दिली आहे.

आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की,  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित केल्या जाणाऱ्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या सर्व परीक्षांसाठी उमेदवारांना दोन भागांची उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्यात येत. त्यापैकी भाग-१(मूळ प्रत) हा परीक्षेनंतर आयोगाच्या कार्यालयाकडे जमा करण्यात येतो. तर भाग-२(कार्बन प्रत) परीक्षेनंतर सोबत घेऊन जाण्याची मुभा उमेदवारास देण्यात आली आहे.

उमेदवारांने परीक्षेच्या वेळी त्यांची उत्तरे उत्तरपत्रिकेवर आयोगाच्या सूचनांनुसार व उत्तर पत्रिकेच्या मलपृष्ठावर सविस्तरपणे उद् घृत केलेल्या सूचनांनानुसार नोंदवणे(वर्तुळ छायांकित करणे) गरजेचे आहे. उत्तरपत्रिकेच्या भाग-२(कार्बन प्रत) वरून उमेदवारास त्याने संबधित परीक्षेमध्ये छायांकित केलेली उत्तरे आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या उत्तरतालकेवरून पडताळून पाहता येतात. त्यामुळे उमेदवारास प्राप्त होऊ शकणाऱ्या गुणांचा अंदाज बांधता येतो.

उमेदवारांना त्यांनी संबधित परीक्षेमध्ये प्रत्यक्ष प्राप्त केलेले अचूक गुण ज्ञात व्हावेत व उमेदवारास परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या संदर्भात कोणतीही शंका राहू नये, यासाठी खालील तपशील संबधित परीक्षेच्या निकालानंतर त्यांच्या वैयक्तिक प्रोफाईलद्वारे उपलब्ध करून देण्याचा आयोगाकडून निर्णय घेण्यात आला आहे.

१. मूळ उत्तरपत्रिकेची स्कॅन इमेज
२. निकालाकरीता गृहित धरलेले एकूण गुण
३.उमेदवार पात्र असलेल्या प्रवर्गाकरीताच्या गुणांची किमान सीमांकन रेषा

आयोगाचा उपरोक्त निर्णय १ ऑक्टोबर २०२० नंतर आयोजित होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा तसेच चाळणी परीक्षांसाठी लागू राहणार असल्याचे कळवण्यात आले आहे.

UPSC Exam 2020

UPSC Prelims 2020 Exam Updates

UPSC Exam 2020 Latest Update Details – यूपीएसी पूर्व परीक्षा (प्रिलिम्स) पुढे ढकलण्यास केंद्रीय लोकसेवा आयोगानं असमर्थता दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयात परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात भूमिका मांडताना आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं आयोगानं म्हटलं आहे.

करोनामुळे शालेय व महाविद्यालयीन परीक्षांसह इतर परीक्षांनाही फटका बसला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी यूपीएसी परीक्षांही लांबणीवर टाकण्यात आली होती. आता परीक्षांचं सुधारित वेळापत्रक जाहीर झालं असून, ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र काही उमेदवारांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंठपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगानं परीक्षा पुढे ढकलणे अशक्य असल्याचं न्यायालयाला सांगितलं. परीक्षेसाठीची तयारी पूर्ण झाली असून, आता परीक्षा पुढे ढकलणे अशक्य आहे, अशी माहिती आयोगानं न्यायालयात दिली. त्यावर न्यायालयानं करण्यात आलेल्या तयारीसह शपथपत्र दाखल करण्याचे आदेश आयोगाला दिले. या याचिकेवर आता बुधवारी अर्थात ३० सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.