Jobs Career Opportunity in Digital Edge

Jobs Career Opportunity in Digital Edge

‘हे’ डिजीटल एज जॉब्स देतील भरघोस पगार

Jobs Opportunity : India currently has a wealth of jobs because of the transnational job sector down. In this case, if you do not do any extra vocational course, then your problem is even more aggravating. But the big question is whether to do the course. All the Institutions in the market are making big claims stating how good our course is. Of course, many of them are deceitful. There is a lot of competition in the transitional job sector. So you can try out some handy jobs too. These jobs can be called digital edge jobs. You have to do some short term courses for this. If you take these courses for a few months, you can get a salary of Rs. 25000 to 40000/- per month.

Jobs Opportunity in Digital Edge

भारतात सध्या ट्रॅडिशनल जॉब सेक्टर डाऊन असल्याने नोकऱ्यांची वानवा आहे. अशात जर तुम्ही कुठला एक्स्ट्रा व्होकेशनल कोर्स केला नसेल तर तुमच्या समस्यांमध्ये आणखी भर पडते. पण कोर्स तरी कुठला करायचा हा मोठा प्रश्न असतो. मार्केटमध्ये सगळ्याच इन्स्टिट्यूशन आमचाच कोर्स कसा चांगला हे सांगत मोठे दावे करत असतात. अर्थात त्यापैकी बरेचसे फसवे असतात. ट्रॅडिशनल जॉब सेक्टरमध्ये खूप स्पर्धा आहे. म्हणून तुम्ही काही हटके जॉबदेखील ट्राय करू शकता. या जॉब्सना डिजीटल एज जॉब म्हटलं जाऊ शकतं. यासाठी तुम्हाला काही शॉर्ट टर्म कोर्सेस करावे लागतात. काही महिन्यांचे हे कोर्सेस केले तर तुम्हाला २५ हजार ते ४० हजार रुपये पगाराची नोकरी नक्की मिळू शकते…

​डिजीटल एज जॉब, भरपूर पगार!

डिजीटल एज जॉब म्हणजे काळानुसार अद्ययावत तंत्रज्ञानामुळे कामाच्या क्षेत्रांमध्ये जे बदल झाले आहेत, त्यातील जॉब. हे जॉब म्हणजे डिजीटल मार्केटिंगपासून डिजीटल इकॉनॉमीच्या क्षेत्रातले वेगवेगळ्या प्रकारचे जॉब. हे असे जॉब आहेत ज्यांच्यासाठी पदवीनंतर एखादा विशिष्ट कोर्स केला की तुम्ही अशा नोकऱ्यांसाठी पात्र ठरू शकता. इंटरनेट वरील सर्फिंग काळानुसार वाढलं आहे. टेलिकॉम कंपन्यांच्या स्पर्धांमुळे सामान्य माणसाच्या हातातही नेट पोहोचलं आहे आणि त्याला त्याची सवय लागली आहे. याअनुषंगाने इंटरनेटवरील गरजा ओळखून या जॉबसाठी मनुष्यबळाला मागणी आहे. पाहूयात कोणते आहेत हे जॉब…

पीपीसी
पीपीसी म्हणजे ‘पे पर क्लिक’. डिजीटल मार्केटिंगमध्ये एसईओप्रमाणे पे पर क्लिकला देखील खूप मागणी आहे. पीपीसीचं काम करणाऱ्याचं मुख्य कौशल्य सर्च इंजिनकडून सेल्स आणि ट्रॅफिक आणणं हे असतं. म्हणजेच इंटरनेटवरील पेड अॅडव्हर्टायझिंग. डिजीटल एजन्सी क्लायन्टच्या अशा जाहिरातींचं काम करते. जाहिरात देणाऱ्या कंपनीची जाहिरात जेव्हा जेव्हा क्लिक होते तेव्हा प्रति क्लिकसाठी ठराविक पैसे मिळतात. अशा एजन्सींमध्ये किंवा मार्केटिंग कंपन्यांमध्ये पीपीसी एक्झिक्युटिव्ह किंवा तत्सम जॉबला मागणी असते. पीपीसीचा शॉर्ट टर्म कोर्स केलात तर तु्म्ही पीपीसीचं काम करून चांगली कमाई करू शकता.

​वेब डिझाइनिंग
आजकाल कोणापर्यंतही पोहोचण्याचा सर्वात जलद आणि स्वस्त मार्ग म्हणजे इंटरनेट. परिणामी इंटरनेटवर स्वत:चं चांगलं पेज, संकेतस्थळ बनवण्याचं कंपनीचं धोरण असतं, लघु उद्योजकांपासून फ्रीलान्सर्सपर्यंत कोणीही स्वत:चं संकेतस्थळ बनवू शकत असल्याने हे पेज बनवणाऱ्यांना खूप मागणी आहे. तुम्ही वेब डिझाइनिंगचा कोर्स करून चांगली कमाई करू शकता. तुम्ही पदवीधर झाल्यानंतर वेब डिझायनिंग करू शकता. फ्रिलान्सिंग काम करू शकता किंवा स्वत:ची कंपनीही सुरू करू शकता.

एसईओ कोर्स
डिजीटल इकॉनॉमीसाठी एसईओचा रोल खूप महत्त्वाचा असतो. SEO म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. तुम्ही जेव्हा गुगलवर काहीही सर्च करता तेव्हा काही साइट्सच्या बातम्या वर दिसतात. हे योगायोगाने होत नाही. यामागे एसईओ टीमचा हात असतो. एसईओचं काम पाहणाऱ्या लोकांची ही जबाबदारी असते की गुगल सर्चमध्ये त्यांच्या कंपनीचं नाव टॉपवर असेल. एसईओचा कोर्स केल्यानंतर तुम्ही फ्रीलान्सर म्हणूनही काम करू शकता किंवा कंपनीत जॉबही करू शकता.

अॅनिमेशन
अॅनिमेशन तंत्रज्ञान नवं नाही. पण या कोर्सची गरज सध्या वाढली आहे. तुम्हाला कलेची आवड असेल, क्रिएटिव्हीटी असणं मात्र मस्ट आहे. अॅनिमेशन प्रोफेशनलची मागणी जाहिरात, सिनेमा, कार्टून इंडस्ट्री अशी अनेक ठिकाणी असते. तुम्ही २डी आणि ३ डी अॅनिमेशन कोर्स शिकू शकता.

ग्राफिक डिझाइनिंग
मीडिया कंपन्यांपासून अॅडव्हरटायझिगं कंपन्यापर्यंत ग्राफिक डिझायनर्सला खूप डिमांड आहे. ग्राफिक डिझायनर व्हिज्युअल कन्सेप्ट्स तयार करण्याचं काम करतात. लोगो डिझाइनर, व्हिज्युअल इमेज डेव्हलपर, आर्ट प्रोडक्शन मॅनेजर यासारख्या पदांवर तुम्हाला काम मिळू शकतं. ग्राफिक डिझाइनरचे विविध कोर्सेस असतात. फाउंडेशन डिग्री कोर्स असतो. विविध स्पेशलाइज्ड विषयांचे कोर्सेसही करता येतात. इलस्ट्रेटर, इन डिझाइन किंवा क्वार्क एक्सप्रेस, फोटोशॉपचं नॉलेज तुम्हाला हवं. कलेचं अंग हवं, तर तुम्ही अधिक चांगलं काम कराल.

सौर्स : मटा

Govt Exam now through MPSC

Govt Exam now through MPSC

परीक्षा ‘एमपीएससी’तर्फेच घ्याव्यात

MPSC EXAM 2020 DETAILS : All Government recruitment now through the MPSC Portal. If the state government does not make a decision on the appointment of MPSC by the administration soon, the next two marches will be organized by the MPSC Coordination Committee and MPSC Student Rights. Earlier, the hashtag #onlyMPSC will be launched on Twitter and social media from February 7. Read the complete details carefully and keep visit us.

MPSC EXAM 2020 DETAILS

राज्या सरकारने ‘क’ आणि ‘ड’ प्रवर्गातील पदभरतीच्या परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घ्याव्यात,’ अशी मागणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमदेवारांसोबतच लोकप्रतिनिधींधी केली आहे. राज्य सरकारने महापरीक्षा पोर्टल बंद करण्याचा निर्णय घेतल्यावर राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार रोहित पवार यांच्यासोबत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी सरकारचे अभिनंदन केले. तसेच आता पदभरतीच्या परीक्षा ‘एमपीएससी’ प्रशासनाकडून घेण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे उमेदवारांचे लक्ष लागले आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी महापरीक्षा पोर्टल बंद केल्याबद्दल महाविकास आघाडीचे अभिनंदन करून सरकारचे धन्यवाद मानले आहे. त्याचवेळी, ‘सर्व नोकरभरती ‘एमपीएससी’मार्फत व्हावी, ही विनंती,’ असे ट्विट केले आहे. आमदार रोहित पवार यांनी महापरीक्षा पोर्टल बंद केल्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिनंदन केले आहे. ‘आता दुसरे कोणतेही पोर्टल न आणता यापुढील नोकरभरती ‘एमपीएससी’मार्फतच व्हावी आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘एमपीएससी’ला ताकद द्यावी, ही विनंती,’ असे ट्विट केले आहे. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ‘महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा आणि त्याजागी एक पर्यायी व्यवस्था विभागीय स्तरावर आणण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण, या भरती प्रक्रियेत ‘एमपीएससी’ला सामावून घेण्याची; तसेच महापरीक्षा पोर्टलच्या वतीने झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी करतो,’ असे ट्विट केले आहे. महापरीक्षा पोर्टल बंद होण्यासाठी या लोकप्रतिनिधींसोबत खासदार सुप्रिया सुळे यांनीही पाठपुरावा केला होता.

‘राज्य सरकारने पदभरतीची परीक्षा ‘एमपीएससी’ प्रशासनाद्वारे घेण्याबाबतचा निर्णय लवकर न घेतल्यास येत्या दोन मार्चला ‘एमपीएससी’ समन्वय समिती आणि ‘एमपीएससी स्टुडन्ट राइट्स’द्वारे आंदोलन करण्यात येईल. त्यापूर्वी २४ फेब्रुवारीपासून ट्विटर आणि सोशल मीडियावर #onlyMPSC अशी हॅशटॅग मोहीम चालविण्यात येणार आहे,’ अशी माहिती किरण निंभोरे, राहुल कवठेकर, महेश बडे, पद्माकर होळंबे यांच्यासह उमेदवारांनी केली आहे. सरकारने ‘एमपीएससी’द्वारे परीक्षा घ्यायचा निर्णय त्वरित करून न्याय द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली आहे.

Mahapariksha Portal Closed Now

Mahapariksha Portal Closed Now

अखेर महापोर्टल बंद होणार; महाभरतीचे काम नव्या संस्थेला देण्यासाठी कार्यवाही सुरू

Government issued direction to shut mahapariksha portal recruitment will be done by new organisation. The government has issued a government order to appoint a new institute instead of a corporation for the recruitment of groups ‘C’ and ‘D’ in the state government. The government has announced the selection of a new organization through Maha IT for the Mahabharati of the Alliance for Development. Read the complete details carefully.

Mahapariksha Portal Issues

मुंबई : तत्कालिन फडणवीस सरकारने नोकरभरती साठी निवडलेल्या महापोर्टल मधे सावळागोधळ असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हे महापोर्टल रद्द करून नव्याने सुधारणा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज याबाबतची कार्यवाही सुरू करण्याचा आदेश सरकारने जाहिर केला.

राज्य शासनातील गट ‘क’ व ‘ड’ च्या पदभरतीसाठी महापोर्टल ऐवजी  नव्या संस्थेची निवड करण्याचा शासन आदेश सरकारने झाहिर केला. महाविकास आघाडी सरकारच्या महाभरतीसाठी  महाआयटी मार्फत  नव्या संस्थेची निवड करण्याचे आदेश सरकारने जाहिर केले.

महापोर्टलबाबत आलेल्या तक्रारीनंतर महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय तत्कालिन फडणविस सरकारच्या निर्णयाला धक्का मानला जात आहे. महापोर्टलच्या माध्यमातून फडणविस सरकारने नोकर भरतीचा मेगा कार्यक्रम सुरू केला होता. पण तलाठी भरतीसह इतर नोकरभरतीत महापोर्टलच्या कार्यपध्तीवर शाकडो तक्रारी दाखल झाल्या होत्या. महापोर्टल ची भरती प्रक्रिया सदोष असल्याचे अनेक उमेदवारांचे मत होते. त्यामुळे हे महापोर्टल रद्द करण्याची मागणी घेवून राज्यभरात आंदोलन सुरू होते.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही महापोर्टल रद्द करून नव्याने सुधारणा करण्याची मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानुसार सुरूवातीला महापोर्टल च्या माध्यमातून होणार्या नोकरभरतीला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. आज सरकारने काढलेल्या आदेशात महापोर्टलला सकम व पारदर्शक पध्दतीने नोकरभरती करणारा नविन पर्याय शोधण्याचे आदेश महाआयटी विभागाला दिले आहेत.

सौर्स: सकाळ

India’s top 11 educational institutions in the 100 world !

India’s top 11 educational institutions in the 100 world !

भारताच्या ११ शैक्षणिक संस्था जगातल्या टॉप १०० मध्ये!

Indian Educational Institute : This year, India’s top 11 universities have been ranked among the top 100 universities in the world. The University of Times Higher Education Emerging Economies is ranked 2020 in the rankings of 47 countries. It has the top 30 companies in China.

The list was announced on Tuesday evening. There are 533 institutions in India, out of a total of 56 institutions in 47 countries. There are 11 educational institutions in India in the top 100. The Indian Institute of Science (IISC) is in 16th place. Apart from this, IIT Kharagpur is at 32, IIT Delhi at 387 and IIT Madras at 63th.

IIT Ropad, Institute of Chemical Technology and Amrit Vishwa University have been placed in the top 100 for the first time. This ranking started on the 2014. For the second time, 11 educational institutions of India have come in the top 100.

जगातल्या टॉप १०० विद्यापीठांमध्ये या वर्षी भारताच्या ११ विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे. टाइम्स हायर एज्युकेशन इमर्जिंग इकॉनॉमिज विद्यापीठ रँकिंग २०२० मध्ये ४७ देशांच्या शैक्षणिक संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. यात चीनच्या सर्वाधिक ३० संस्था आहेत.

मंगळवारी सायंकाळी ही यादी जाहीर झाली. ४७ देशांच्या एकूण ५३३ संस्थांमध्ये भारताच्या ५६ संस्था आहेत. टॉप १०० मध्ये भारताच्या ११ शैक्षणिक संस्था आहेत. भारतीय विज्ञान संस्था (IISC) १६ व्या स्थानी आहे. याव्यतिरिक्त आयआयची खरगपूर ३२, आयआयटी दिल्ली ३८ तर आयआयटी मद्रास ६३ व्या स्थानी आहे.

आयआयटी रोपड, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आणि अमृत विश्व विद्यापीठम यांना टॉप १०० मध्ये पहिल्यांदा स्थान मिळाले आहे. या रँकिंगची सुरुवात २०१४ ला झाली. त्यानंतर दुसऱ्यांदा भारताच्या ११ शैक्षणिक संस्था टॉप १०० मध्ये आल्या आहेत.

सौर्स : मटा

Solapur Municipal Corporation Recruitment Results

Solapur Municipal Corporation Recruitment Results

सोलापूर महापालिका भरती निवड आणि प्रतिक्षीत यादी

Solapur Mahanagarpalika Bharti Results and Final Selection Lists is given here. Solapur published the Selection lists for 32 post recruitment as well as the waiting lists. Candidates check the lists below on this article. Posts wise separate link are given below. Keep visit us for Solapur Mahanagarpalika Bharti 2020 udpates. Thanks

Solapur MahanagarPalika Bharti 2020

सोलापूर महापालिकेत `यांना` मिळाली कायमची नोकरी

अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी विशेष भरती मोहिमेंतर्गत सोलापूर महापालिकेत 32 जागांवर थेट भरती करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी आणि प्रतिक्षीत यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली.

जागा 32, उमेदवार 7168, बसले 4507

भरती करायच्या 32 जागांसाठी तब्बल एक हजार 77 उमेदवार लेखी परीक्षेसाठी अपात्र झाले होते. उर्वरित सहा हजार 52 उमेदवारांना लेखी परीक्षेचे पत्र पाठविण्यात आले. या जागांसाठी सोलापूरसह नांदेड, परभणी, धुळे, अकोला, हिंगोली येथून अर्ज दाखल झाले होते. 1546 जणांनी परिक्षेला दांडी मारली. महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर या विंडोमध्ये हा निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही विशेष मोहिम भरतीसाठी आयुक्त दीपक तावरे, उपायुक्त अजयसिंह पवार, सहायक नगर रचना संचालक लक्ष्मण चलवादी, युवराज गाडेकर, श्री. होर्गीनमठ यांच्यासह त्यांच्या सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रक्रिया राबवली.

शिक्षण सेवक पदासाठी एकच अर्ज

शिक्षण सेवक पदाची एक जागा भरण्यात आली. ही जागा महिला प्रवर्गासाठी राखीव होती. त्यासाठी एकूण 18 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, हिंगणी (जि. नागपूर) येथील तांडा (दाभा) येथील सोनाली कांतीराम शिंदे या एकमेव उमेदवार पात्र ठरल्या होत्या. त्यांची नियुक्ती या पदावर करण्यात आली आहे. या पदासाठी सोलापूरसह हिंगोली, पुणे, सिंदखेड, कराड, नांदेड, उस्मानाबाद, कोरेगाव येथील उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या ई-मेल आणि मोबाईल मेसेजद्वारे निरोप पाठविण्यात आला आहे.

सौर्स : सकाळ

सोलापूर महापालिका 32 जागेची निवड आणि प्रतिक्षीत यादी

1 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 03 सहाय्यक आरेखक Open Link
2 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 04 कनिष्ठ श्रेणी लिपिक Open Link
3 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 05 मिडवाईफ Open Link
4 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 06 अनुरेखक Open Link
5 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 08 शिपाई Open Link
6 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 09 मजूर Open Link
7 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 10 माळी Open Link
8 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 11 लॅम्प लायटर Open Link
9 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 12 शिक्षण सेवक Open Link
10 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 01 अवेक्षक Open Link
11 अनुसुचित जमाती विशेष भरती मोहिम 2019-20 निवड यादी / प्रतिक्षायादी – 07 वाहन चालक Open Link